Pune : जगदीश मुळीक फाउंडेशनचे उद्या विनामूल्य महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने(Pune)  रविवार 14 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत येरवडा जेल समोरील के. के. भवन सभागृहात विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हृदयरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सप्रेस, डायलिसिस, रक्त तपासण्या, कर्करोग चिकित्सा व शस्त्रक्रिया स्त्रीरोग चिकित्सा मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप बालरोग चिकित्सा दिव्यांगांना कृत्रिम अवयव व्हेल चेअर वितरण आदी आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जाणार आहेत.

Pune : संगणक साक्षरतेतून होणार रोजगार निर्मिती ; प्रभाग दोनमध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

या महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक पुणेकरांनी (Pune)लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिका, हेल्थ प्रो, रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल, लक्ष फाउंडेशन, सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, डायग्रोपिन डायजेस्टिक सेंटर या वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.