Pune : हॉकी 2023 स्पर्धेत क्रिडा प्रबोधिनी संघाचा सलग दुसऱ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

जीएसटी कस्टम, इन्कम टॅक्स संघांनी देखील सहज विजय मिळवला

एमपीसी न्यूज : नेहरूनगर- पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम (Pune)येथे हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व एक्सलंस हॉकी अकादमी आणि धनराज पिल्ले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत साखळी फेरीत क गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने हॉकी लव्हर्स अकादमीचा 10-0 असा एकतर्फी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

क्रीडा प्रबोधिनी संघाकडून विनायक हांडे(22, 33, 42वे), रोहन पाटील(37, 50, 53वे)यांनी प्रत्येकी तीन गोल, व्यंकटेश केंचे(16वे, 21वे)ने दोन गोल कार्तिक पठारे(59वे)याने एक गोल केला.

जीएसटी कस्टम पुणे संघाने फ्रेंड्स युनियन क्लबवर 6-1 असा विजय मिळवला. (Pune)जीएसटी कस्टम पुणे संघाकडून स्टीफन स्वामी(32, 50वे)ने दोन गोल तर, अनिकेत गुरव(9वे.), प्रणव माने(18वे.), सतीश पॉल(36वे), सेबॅस्टियन दास(38वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून रेहान शेख(59वे)ने एक गोल केला.

ड गटात चिराग माने(7,18, 32,43, 57वे)याने केलेल्या पाच गोलांच्या जोरावर इन्कम टॅक्स पुणे संघाने पुना हॉकी अकादमी संघाचा 11-0 असा पराभव केला.

Hinjawadi : जमिनीची मोजणी करण्यास प्रतिकार केल्याने जीवे मारण्याची धमकी

महिला गटात पीसीएमसी हॉकी अकादमी संघाने जे.जे हॉकी अकादमीचा 9-0 असा पराभव केला. पीसीएमसी हॉकी अकादमी कडून दिक्षा अवघडे(18, 35, 53वे)ने तीन गोल, तर दुर्गा शिंदे(5, 20वे)ने दोन गोल, भावना खाडे(7वे), आफरीन शेख(9वे), सानिका माने(45वे) अन्वी रावत(48वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल:


क गट: जीएसटी कस्टम पुणे: 6 (अनिकेत गुरव 9वे.; प्रणव माने 18वे.; स्टीफन स्वामी 32, 50वे; सतीश पॉल 36वे; सेबॅस्टियन दास 38वे) वि.वि.फ्रेंड्स युनियन क्लब: 1 (रेहान शेख 59वे);

क्रीडा प्रबोधिनी: 10 (सचिन कोळेकर 14वे; व्यंकटेश केंचे 16वे, 21वे; विनायक हांडे 22, 33, 42वे; रोहन पाटील 37, 50, 53वे; कार्तिक पठारे 59वे) वि.वि.हॉकी लव्हर्स अकादमी: 0;

ड गट: इन्कम टॅक्स पुणे: 11 (चिराग माने 7,18, 32,43, 57वे; रितेश पवार 13वे; विक्रम सिंग 15वे; आशुतोष लिंगेश 28, 39, 59वे; राहुल सँडेर 28 वे) वि.वि.पुना हॉकी अकादमी: 0.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: 4 (टिकराम ठाकुल्ला 8वे; आदित्य रसाळ 15वे; राज पाटील 20वे; तेजस चौहान 39वे) वि.वि.रेल्वे लाईन बॉईज: 2 (ओंकार मुसळे 28वे; अमोल भोसले 40वे);

महिला गट:
ब गट: पीसीएमसी हॉकी अकादमी: 9 (दुर्गा शिंदे 5, 20वे; भावना खाडे 7वे; आफरीन शेख 9वे; दिक्षा अवघडे 18, 35, 53वे; सानिका माने 45वे; अन्वी रावत 48वे) वि.वि.जे.जे हॉकी अकादमी: 0.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.