Pune : ललित पाटीलला पुण्यात सुरू करायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना

पुणे पोलिसांची न्यायालयात महत्त्वाची माहिती

एमपीसी न्यूज -ललित पाटीलला पुण्यात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात  सादर केली आहे.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. विजय खरे यांची नियुक्ती

अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ललित पाटील व त्याच्या साथीदारांना  नाशिकप्रमाणे पुण्यातही अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र त्यांचे रॅकेट उघडकीस आल्याने त्यांचा डाव फसला असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला येथून तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला भोईसर येथून बुधवारी अटक केली आहे. या दोघांचा पुणे पोलिसांनी गुरुवारी ताबा घेतला.

या दोन्ही आरोपींनी ललित पाटील ला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा संशय आहे. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी हा दावा केला आहे. न्यायलयाने दोन्ही आरोपींना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हरिश्चंद्र पंत याचा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि टोळीप्रमुख अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून तो हे काम करीत होता.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.