Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. विजय खरे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव (Pune)डॉ. प्रफुल्ल पवार यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांची प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्णवेळ कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (Pune) आणि पुढील आदेशापर्यंत डॉ. खरे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी राहणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ 12 नोव्हेंबर रोजी पूर्ण केला.

आता डॉ. पवार पुन्हा विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची जबाबदारी डॉ. विजय खरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Nana Patekar : चाहत्याला टपली मारल्याच्या प्रकरणावरुन नाना पाटेकरांचा नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

कुलसचिव पदाच्या भरतीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे जाहिरात प्रसिद्ध करून पूर्णवेळ कुलसचिवांची निवड, नियुक्ती होईपर्यंत डॉ. खरे यांना कुलसचिव पदाची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटना, राजकीय वाद झाले होते. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तणावातूनच विद्यापीठ परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय कामकाज सुरळीत राहण्याचे आव्हान डॉ. खरे यांच्यासमोर आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.