Pune : ललित पाटीलच्या आणखीन दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज -अमली पदार्थ  तस्कर ललित पाटील प्रकरणी (Pune) आणखीन दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून, तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला बोईसर मुंबई येथून बुधवारी पुणे पोलिसांनी अटक केली.

Pune : पुणे शहरातील रूफ टॉप हॉटेल विरोधात पुणे महानगरपालिका आक्रमक

या दोन्ही आरोपींनी ललित पाटीलला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी मदत केल्याचा पुणे पोलिसांना संशय  आहे. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आठ आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी (Pune)  सुनावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.