Pune : पुण्यात होणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या दरबाराला अंनिसचा विरोध; कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एमपीसी न्यूज : बागेश्वर महाराज (Pune) उर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला आता अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेकडून विरोध करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पुण्यात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून राज्यात जादूटोणा कायदा अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी अनिसकडून करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य म.अंनिसचे मिलींद देशमुख यांनी दिली. 

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला होता. येत्या 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी बागेश्वर महाराज यांचा सत्संग आणि दरबाराचे आयोजन भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आयोजित केला आहे.

Sahakarnagar : धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवले

पुण्यातील संगमवाडी जवळ असणाऱ्या मैदानाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी (Pune) होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.