Gopichand Padalkar : मुख्यमंत्री यांना राजधर्माची आठवण करुन देणे गरजेची, ओबीसींच्या महाएल्गार सभेत गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

एमपीसी न्यूज – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी(Gopichand Padalkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. “तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी”, असा रोखठोक इशारा पडळकरांनी दिला आहे.

दरम्यान, तिकडे जालन्यात आज (शुक्रवारी)ओबीसींच्या(Gopichand Padalkar) महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, अशी प्रमुख मागणी ओबीसींची आहे. या आणि अन्य मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पडळकर बोलत होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे , विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , महादेव जानकर , गोपीचंद पडळकर , शिवाजीराव चोथे यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आदी नेते उपस्थित होते.

Pune : ललित पाटीलला पुण्यात सुरू करायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना

गोपीचंद पडळकर म्हणाले की, माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात.आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.

आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती.धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी साठी शासनाने 50 दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे.तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही.फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे. अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे.

आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबजावणी होइल , ही आशा सामान्य धनगरांना आहे .मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत.

त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे.समित्या गठित करूण धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा.अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी.हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.