Pune : प्रियकरासाठी कर्ज काढले मात्र हप्ते न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रियकराच्या सांगण्यावरून तिने तीन लाख 75 हजार रुपयांचे (Pune) कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते प्रियकर फेडणार होता. मात्र आश्वासन देऊनही प्रियकराने कर्ज न फेडल्याने 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. हडपसर परिसरातील मांजरीत हा प्रकार घडला.

आदर्श अजयकुमार मेनन (वय 25) याला अटक करण्यात आली आहे. तर राणी उर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Pimpri : गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी मिळवा टोल फ्री चा पास, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुविधा उपलब्ध

या प्रकरणी अधिक माहिती अशी की राणी आणि आरोपी आदर्श या दोघांचे प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून मयत तरुणीने वेळोवेळी क्रेडिट कार्ड पर्सनल लोन आणि इतर पाच ते सहा लोन ॲप वरून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेऊन ते पैसे त्याला खर्च करण्यासाठी दिले होते.

या कर्जाचे हप्ते आरोपी प्रियकर फेडणार होता. मात्र त्याने ते वेळोवेळी फेडले नाही. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण देखील झाले होते. याचाच मानसिक त्रास झाल्याने रसिका हिने 14 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक (Pune)  तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.