BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार

पुण्याच्या चंदननगर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज- प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाला. ही घटना चंदननगर परिसरात मंगळवारी (दि. 11) रात्री घडली.

मीना पटेल (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय 25) असे खून करून फरार झालेल्या प्रियकरचे नाव आहे.

आरोपी किरण शिंदे हा काळेवाडी येथे राहण्यास असून इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो..तर मृत मुलगी मीना पटेल एका कॉलसेंटरमध्ये कामाला होती. एक वर्षांपासून दोघात प्रेमसंबंध होते. प्रेयसीचे प्रेमसंबंध दुसऱ्याच तरुणाशी जुळले असावे असा संशय शिंदे याला होता. त्यातुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले.

मंगळवारी रात्री 10 वाजता त्यांच्यात परत वाद झाला. रागाच्या भरात त्याने चाकूने मीना पटले हिच्या पोटावर वार केले..गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

.