Pune: महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटीव्ह

Pune Mayor Murlidhar Mohol tests positive for Coronavirus. महापौर मोहोळ यांनी ट्विट्द्वारे माहिती दिली आहे. थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली आहे.

एमपीसी न्यूज – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वत: महापौरांनी ट्विट्द्वारे दिली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या पासून महापौर मुरलीधर मोहोळ शहराच्या विविध भागात फिरत होते. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. विविध बैठकांना हजर राहत होते. त्यातून त्यांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

महापौर मोहोळ यांनी ट्विट्द्वारे माहिती दिली आहे. थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा सर्वांच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे महापौरांनी ट्विट्मध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.