Pune Metro News: मेट्रोच्या रेंजहील येथील कार डेपोचे काम पूर्ण, चाचणीही यशस्वी

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune Metro News) मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या ट्रेनच्या मेंटेनंसाठी रेंजहील येथे (कृषी महाविद्यालयाची मागील बाजूस) मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. तसेच रामवाडी ते वनाज या मार्गिकेसाठी कोथरूड हिल व्हिव पार्क (पूर्वीचा कचरा डेपो) या जागेवर मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. रेंजहील मेट्रो कार डेपोची सर्व कामे पूर्ण झाली.

रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्थानक अशी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मंगळवारी 5 वाजून 15 मिनिटांनी ट्रेन रेंज हिल डेपो इथून निघाली व 5 वाजून 35 मिनिटांनी ट्रेन सुमारे 1 किलो मीटरचे अंतर पार करून ट्रेन रेंज हिल स्थानकापर्यंत आली. ट्रेनची चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार व वेळेवर पार पाडली. येत्या काही आठवड्यात रेंज हिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात येईल.

रेंज हिल मेट्रोच्या कार डेपोची जागा एकूण 12.1 हेक्टर आहे. या कारडेपोमध्ये मेट्रो प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्न मिळणार आहे. रेंजहिल कार मेट्रो कार डेपो येथे (ETU) बिल्डिंग, इंटीग्रेटेड वर्कशॉप बिल्डिंग, पिट व्हील लेथ बिल्डिंग आणि ऍडमिन बिल्डिंग इत्यादींची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत. मेट्रोच्या ऑपरेशन अँड कमांड सेंटर (OCC) ची कामे देखील 2 महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहेत.

रेंजहिल डेपो मध्ये 18 ट्रेनचे मेंटेनन्ससाठी (Metro News) सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डेपोमध्ये 18 स्टेबलिंग लाईन, 3 इंस्पेक्शन, 4 रिपेअर बेलाईन, 1 पिट व्हील लेथ, आणि 1 इंजिनिअरिंग ट्रेन युनिट (ETU) लाईन ची उभारणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ऍटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट (ACWP), पिट व्हील लेथ, पिट जॅक, मोबाईल जॅक, बोगी टेस्ट स्टॅन्ड (EOT) क्रेन इत्यादी प्लांट आणि मशिनरी बसवण्यात आले आहेत. सध्या रेंज हिल डेपो येथे 4 ट्रेन प्राप्त झाल्या असून त्यांच्या चाचण्या चालू आहेत.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय (Pune Metro News) संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे कि, रेंज हिल मेट्रो कार डेपो चे काम पूर्ण झाले असून मेट्रो चाचणी हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. येत्या काही दिवसांत मेट्रो ट्रेनची चाचणी शिवाजी नगर – सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानकापर्यंत घेण्यात येईल आणि येत्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक असा थेट प्रवास पुणेकरांना करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.