Nigdi News : निगडीतील मॉडर्न प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज – मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी (Nigdi News) येथे वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रो.ए.सो.चे सदस्य राजीव कुटे, पालक संघाच्या उपाध्यक्षा रेणुका पडवेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तुषार कुटे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष वर्षा आजरेकर, शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका संगिता घुले, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे आदी उपस्थित होते.

Pune News : फुरसुंगी येथे आगीत किराणा मालाचे दुकान जळून खाक, सुदैवाने जिवीत हानी नाही

चार दिवस चाललेल्या (Nigdi News) या शालेय क्रीडा महोत्सवात 100 मीटर धावणे, रिले , अडथळ्यांची शर्यत, लिंबू चमचा, गोल खो खो, अमेरिकन डॉजबॉल इत्यादी मैदानी खेळाद्वारे विद्यार्थ्यानी मनमुराद आनंद लुटला. प्रशालेतील एकूण 150 विद्यार्थी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी झालेत. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष.चित्तरंजन कांबळे यांनी सर्व विजयी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांनी क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. या वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख कैलास माळी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.