Pune Metro : मेट्रो मधून पाळीव प्राणी नेता येणार नाहीत

एमपीसी न्यूज – मेट्रोकडून सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने नवीन नियम लावले जात ( Pune Metro ) आहेत. मेट्रोने आता आणखी एका नियमाबाबत सोशल मिडियावरून माहिती दिली आहे. मेट्रोमध्ये नेण्यासाठी काही वस्तू प्रतिबंधित केल्या आहेत. त्यामध्ये पाळीव प्राणी आणि पक्षी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

बंदूक, चाकू, टोकदार वस्तू, मद्य, सिगारेट, ई-सिगारेट, आगडबी, लाईटर, पेट्रोल, डीझेल असे ज्वलनशील पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, पाळीव प्राणी, पक्षी, रासायनिक पदार्थ, गॅस सिलेंडर आदि वस्तू मेट्रोमधून नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

मेट्रोची स्वच्छता, सुरक्षा या कारणांसाठी वरील वस्तूंना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, मेट्रोमधून सायकल नेता येणार आहे. सुरुवातीपासून मेट्रोने सायकल चालविण्यासाठी प्रवाशांना चालना मिळावी यासाठी तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलला मेट्रोमधून प्रवासाची मुभा दिलेली आहे.

Moshi : मोशीतील अतिउच्चदाब वीज उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न सुटणार, प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मेट्रो कडून मागील काही दिवसांपासून सातत्याने नवीन नियम, अटी शर्ती जाहीर केल्या जात आहेत. विनातिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मेट्रोने तिकीट दरांमध्ये वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या. दुहेरी प्रवासासाठी असलेले नियम देखील मेट्रोने जाहीर केले आहेत.

वर्षभरात 93 लाख जणांनी केला मेट्रोने प्रवास

1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत तब्बल 93 लाख दोन हजार 891 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी-चिंचवड महापालिका ते सिव्हील कोर्ट आणि रुबी हॉल क्लिनिक ते वनाझ या मार्गावर मेट्रो सेवा सुरु आहे. उर्वरित मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असून पुढील काही महिन्यांमध्ये दोन्ही मार्गिकांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सेवा सुरु होणार आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील प्रवाशांकडून मेट्रोला पसंत मिळत ( Pune Metro ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.