Narendra Modi In Nashik : माझा सर्वात अधिक विश्वास भारताच्या युवकांवर आहे – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज –  स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी देशासाठी संपूर्ण (Narendra Modi In Nashik) आयुष्य समर्पित केले. अमृत काळात युवकांवर भारताला नवीन उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. पुढील पिढी आपल्याला आपल्या कामामुळे लक्षात ठेवेल. आताची युवा पिढी एकविसाच्या शतकातील सर्वात सौभाग्याशाली पिढी आहे. माझा सर्वात अधिक विश्वास भारताच्या युवकांवर आहे. युवकांमधील सामर्थ्य आणि विश्वास देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नाशिक येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभात नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री भारती पवार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा दिन विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने देशातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस युवा शक्तीचा दिवस आहे. पारतंत्र्याच्या काळात (Narendra Modi In Nashik) नवीन उर्जेने भरणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा दिवस आहे. आजच्या दिवशी भारताच्या नारी शक्तीच्या प्रतिक राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्यांच्या जयंती दिनी वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या विरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी मासाहेब जिजाऊ यांना कोटी कोटी वंदन करतो. भारताच्या अनेक महान व्यक्तींचा महाराष्ट्राच्या मातीशी संबंध राहिला आहे. इथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यासारख्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राजा दिला. रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, अनंत कान्हेरे, चापेकर बंधू यांसारखे अनेक महान व्यक्ती दिले आहेत.

Pune Metro : मेट्रो मधून पाळीव प्राणी नेता येणार नाहीत

नाशिकच्या भूमीत प्रभू श्रीरामांनी भरपूर वेळ घालवला होता. जानेवारी पर्यंत आपण सर्व देशाच्या तिर्थस्थळांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मला नाशिक येथील काळाराम मंदिरात स्वच्छता करण्याची संधी मिळाली आहे. देशातील सर्व मंदिर आणि तीर्थस्थळांवर स्वच्छता अभियान राबवा.

देशातील प्रत्येक महान व्यक्तीने युवकांना महत्वाचा घटक मानले. भारताच्या (Narendra Modi In Nashik) अपेक्षा युवकांच्या प्रतिबद्धतेवर अवलंबून असल्याचे स्वामी विवेकानंद म्हणत असत. भारत जगात पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत आला आहे. ही भारताच्या युवकांची ताकद आहे. भारत जगात पहिल्या तीन स्टार्टअप इको सिस्टीममध्ये आला आहे. ही युवकांची ताकद आहे. भारत नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहे, पेटंट मिळवत आहे, उत्पादनाचे केंद्र बनत आहे, हे भारतीय युवकांचे सामर्थ्य आहे. भारताच्या युवकांना त्यांच्या जीवनातील सुवर्णक्षण अमृतकाळाच्या निमित्ताने मिळाला आहे.

एम विश्वेश्वरैया, मेजर ध्यानचंद, भगतसिंग, बटुकेश्वर महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे देत त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. अमृत काळात युवकांवर भारताला नवीन उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. पुढील पिढी आपल्याला आपल्या कामामुळे लक्षात ठेवेल. आताची युवा पिढी एकविसाच्या शतकातील सर्वात सौभाग्याशाली पिढी आहे. माझा सर्वात अधिक विश्वास भारताच्या युवकांवर आहे. आपले सामर्थ्य आणि विश्वास देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

गेल्या दहा वर्षांत आम्ही युवकांना नवीन संधी देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, रोजगार, स्टार्टअप, अशा विविध क्षेत्रातून युवकांना सहकार्य केले आहे. 21 व्या शतकातील आधुनिक शिक्षण देण्यासाठी नवीन शिक्षण धोरण लागू केले आहे. पीएम कौशल्य योजनेद्वारे कोट्यावधी युवकांना जोडण्यात आले आहे. जग आज भारताला प्रशिक्षित फोर्स म्हणून ओळखत आहे. फ्रांस, जर्मनी, युके, ऑस्ट्रेलिया, इटली, ऑस्ट्रिया या देशांसोबत भारताने विविध करार केले आहेत. त्याचा फायदा युवकांना होत आहे. युवकांना नवीन अवकाश निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक क्षेत्रात सरकार काम करत आहे.

ऑटोमिक, अवकाश क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. मागील सरकारच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट निधी दिला जात आहे. चांगले रस्ते, वंदे भारत रेल्वे, नवीन विमानतळ, मोबाईल डेटा अशा सेवा नागरिकांसाठी दिल्या जात आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगात पुढे आहे. चांद्रयान आणि आदित्य एल 1 हे त्याचे प्रतिक आहे. आता अमृतकाळात याच्याही पुढे जायचे आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचे आहे. भारताला जगातील सर्वात मोठे उत्पादन क्षेत्र बनवायचे आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर द्यायचा आहे.

योग आणि आयुर्वेद भारताची ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर याला मागे टाकण्यात आले. आता पुन्हा जगात याला महत्व मिळाले आहे. भारत लोकशाहीचा जनक आहे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे वाटोळे केले. युवकांनी राजकारणात यावे. युवकांनी मतदान करून आपला अधिकार मिळवावा. यामुळे लोकशाही सशक्त होईल. देशाचा अमृतकाळ युवकांसाठी कर्तव्यकाळ आहे. व्यसनांपासून युवकांनी दूर राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कोट्यावधी रामभक्तांचे स्वप्न अयोध्या राम मंदिराच्या रूपाने पूर्ण होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होत आहे. मी मोदींबद्दल एवढेच म्हणू शकतो, ‘मोदी है तो मुमकिन है’. आता देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. जगात भारताचा लौकिक गाजत आहे. जी 20, चांद्रयान अशा अनेक मोहिमा आणि कार्यक्रम यशस्वी होत आहेत. देश महासत्तेच्या दिशेने जात आहे. भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणण्यास मोदींच्या नेतृत्वात यश आले आहे. लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर येईल. मोदींच्या रूपाने देशाला दूरदृष्टीचा नेता मिळाला आहे. ‘सशक्त युवा, समृद्ध भारत’ नुसार या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले (Narendra Modi In Nashik) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.