Pune : ‘मनसे’च्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फुटणार!; 9 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे घेणार ‘भाजप’चा समाचार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुण्यात फुटणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचा समाचार घेणार असल्याची कुजबुज आहे. ईडीच्या चौकशीनंतर राज शांत होते. या निवडणुकीचा निमित्ताने त्यांची तोफ आता धडाडणार आहे. बुधवारी (दिनांक 9 ऑक्टोबर) सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सभा घेण्यासाठी अलका टॉकीज चौक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मानसेतर्फे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर २०१९) सभेसाठी साठी सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानासाठीचा अर्ज केला असता हे मैदान देण्यास अडचणी असल्याचे वक्तव्य  संस्थेकडून करण्यात आले. पावसाळ्याचा काळ असल्यामुळे नदी पात्रामध्ये सभा घेता येत नाही. निवडणूक काळात प्रचार सभा घेण्यासाठीची मैदाने शासनाकडून संबंधित संस्थांकडून ताब्यात घेत उपलब्ध करून देणे नियमानुसार बंधनकारक असताना, तशी कार्यवाही केली जात नाही. कारण, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे.

शहरातील बहुतांश शाळांच्या मैदानांवर भाजप प्रणित संस्थांचे ताबे असल्याने शाळा मैदान देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये पुणे शहराचा मध्यवस्तीचा भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात सभेसाठी मैदान अथवा जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे अलका टॉकीज चौकात सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.