Pune : येत्या तीन दिवसात पुण्यात मान्सून बरसण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती ( Pune ) असून तळ कोकण व गोवा उपविभागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही तर येत्या तीन दिवसात म्हणजे 23 जून रोजी मान्सून पुणे व मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Pune : महावितरणच्या पुणे परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांची ‘गो-ग्रीन’ मोहीम सुरु

राज्यात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी सोमवारी (दि.19) सायंकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती, मात्र त्यांची पुढील वाटचाल सुरू होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, देशाच्या अन्य भागांत मोसमी वाऱ्यांनी सोमवारी प्रगती केली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरित भागात मोसमी वारे दाखल झाले आहेत.

मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे ते लवकरच पुढे वाटचाल करतील. पुढील तीन दिवसांत मोसमी वारे पुणे आणि मुंबईत दाखल होतील. विदर्भ आणि मराठवाडय़ात मोसमी वारे दाखल होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज  हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला ( Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.