Pune : महावितरणच्या पुणे परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांची ‘गो-ग्रीन’ मोहीम सुरु

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे परिमंडलातील ( Pune) दोन शाखा कार्यालयांतील 100 टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत त्यांनी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे.

दरम्यान, ‘गो-ग्रीन’ योजनेला पुणे परिमंडलातील विजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात  2 हजार 379 विजग्राहकांचा सहभाग वाढला आहे. या योजनेमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या पुणे परिमंडलात आतापर्यंत एक लाख 2 हजार 379 ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. सोबतच पुणे परिमंडल अंतर्गत कार्यरत महावितरणच्या सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Pune : पुणे पोलीस दलातील 14 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत मिळत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे.

वीजबिल तयार झाल्यानंतर ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठवण्यात येते. ‘एसएमएस’द्वारे देखील विजबिलाची माहिती देण्यात येते. पुणे परिमंडलात ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी एक लाख 2 हजार 379 ग्राहकांच्या विजबिलामध्ये वार्षिक 1 कोटी 22 लाख 85 हजार 480 रुपयांची बचत होत आहे.

महावितरणचे पुणे परिमंडल अंतर्गत 228 शाखा, उपविभाग, विभाग व मंडल कार्यालये आहेत तसेच सुमारे 5 हजार 200 अभियंता, अधिकारी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व सहकारी विविध कार्यालयांशी संपर्क व संवाद साधून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.

यामध्ये सर्वप्रथम वडगाव शेरी (नगररोड विभाग) आणि शिवाजीनगर गावठाण (शिवाजीनगर विभाग) या दोन शाखा कार्यालयांसह सहा उपकेंद्रांमधील सहायक अभियंता, नियमित व बाह्यस्त्रोत, प्रशिक्षणार्थी अशा 56 कर्मचाऱ्यांनी नुकताच ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग नोंदविला आहे. याकामी वडगाव शेरीचे सहायक अभियंता कैलास कांबळे व शिवाजीनगरचे सहायक अभियंता चेतन टिकले यांनी पुढाकार ( Pune) घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.