Pune : परिस्थितीवर मात करीत पुत्र घडविणा-या कर्तृत्ववान मातांचा सन्मान

एमपीसी न्यूज- आयुष्यात जोडीदाराची अथवा आर्थिक परिस्थितीची साथ नसतानाही ज्या मातांनी आपल्या पुत्रांना घडविले अशा कर्तृत्ववान मातांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मातृशक्ति कसबा पेठ, समस्त हिंदू आघाडी, लालमहाल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त लाल महाल येथे सहा महिलांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वीरमाता रेखा बेंद्रे, पतीचे निधन झाल्यावर स्वयंपाकाची कामे करून मुलाला घडविलेल्या वृंदा गायकवाड, रोहिणी फडतरे, विश्रांती शिरसाट, वीरपत्नी हेमवती काची, चंद्रप्रभा धावडे या मातांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुनीला सोवनी म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडण-घडणीमध्ये जिजाऊंचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढले त्यामागे प्रेरणा जिजाऊंची होती. त्यावेळच्या परिस्थितीतही आपल्या पुत्राने हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे स्वप्न पहातच जिजाऊंनी शिवरायांना तशी शिकवण दिली. लोकमाता, वीरमाता असे जिजाऊंसारखे व्यक्तीमत्व मिळणे अवघड आहे. अशा थोर मातेचे म्हणजेचे राजमाता जिजाऊंचे अवलोकन करणे ही आजच्या काळाची गरज आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.