Jansanvad Sabha : पुणे महापालिकेनेही आठवड्याला जनसंवाद सभांचे आयोजन करावे; रयत विद्यार्थी परिषदेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी जनसंवाद सभेचे (Jansanvad Sabha) आयोजन करते. त्याच धर्तीवर पुणे माहापालिकेनेही दर आठवड्याला प्रभाग निहाय जनसंवाद सभेचे आयोजन करावे, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे मुख्य संघटक ऋषिकेश कानवटे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरिकांना स्वतःचे प्रश्न स्वतः मांडता यावे, यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. जनसंवाद सभेमध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निवारण त्वरित होत असल्यामुळे जनसंवाद सभेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Vadgaon BJP : रस्ता रुंदीकरणाच्या कामात अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध

नागरिकांना सर्व विभागातील अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित असल्यामुळे तक्रार नेमकी कोणाकडे आहे, तक्रारीचे निराकरण किती दिवसात होणार आहे, याची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्ते यांना प्रश्न सोडवण्यासाठी एक मंचच (Jansanvad Sabha) तयार झाला आहे. तरी आपण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय दर सोमवारी होणाऱ्या जनसंवाद सभेचे पाहणी करून पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रयोग यशस्वी करता येईल का याची चाचपणी करून पुणे शहरामध्ये दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यातसंदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.