Pune : गीतातून प्रकटली ‘ ती ‘ची विविध रुपे !

एमपीसी न्यूज- ‘मैया यशोदा ‘ ‘ तुझे सब है पता मेरी माँ ‘ ,’ माँ तू कितनी अच्छी है ‘,अशा अनेक गीतातून ‘ ती ‘ ची विविध रुपे प्रकटली आणि रसिकांची भरभरुन दाद मिळाली ! स. शि. नाईक प्रतिष्ठान आयोजित ‘ तू कितनी अच्छा है ‘ हा मराठी -हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम एस.एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

पृथ्वीराज या विशेष मुलाचे संगोपन करणाऱ्या दया इंगळे या मातेचा सन्मान कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सम्राट नाईक, किशोर सरपोतदार, सुनील पवार, जयश्री नाईक , मीना नाईक, दत्ता उभे हे मान्यवर उपस्थित होते. ‘ अपेक्षा ‘ या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘ सामान्यांना असामान्यांचा सन्मान करण्याची संधी देणारा हा उपक्रम स्तुत्य असून सामाजिकतेची प्रेरणा सर्वांना देणारा आहे ‘, अशा भावना किशोर सरपोतदार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

पृथ्वीराज इंगळे, सतीश इंगळे, रवींद्र शाळू, प्रशांत नाईक, गौरी कडूसकर, डॉ. माधुरी कश्यप, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस, चारुलता बेलखडे, बाळकृष्ण कांबळे, ज्योती नालसे, सम्राट नाईक यांनी गायन केले. विजय बोत्रे – पाटील , धनश्री तुळपुळे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.