Pune : बद्रीनाथ उर्फ नाथाभाऊ रामचंद्र बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज – नाना पेठमध्ये राहणारे माजी नगरसेवक ह. भ. प. बद्रीनाथ उर्फ नाथाभाऊ रामचंद्र बडदे (वय 85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे व पंतवंडे असा परिवार आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस उध्दव बडदे, बडदे गॅरेजचे संचालक दिनेश बडदे व श्री शेडगे पंच मंडळी दिंडी क्र 4 चे अध्यक्ष व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष ह. भ. प. धनंजय बडदे यांचे ते वडील होते.

बडदे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार नेते बाबा आढाव, खासदार गिरीश बापट, माजी आमदार उल्हासदादा पवार, रमेश बागवे, दीपक पायगुडे, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक अरविंद शिंदे, विशाल धनवडे, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, अजय भोसले, वीरेंद्र किराड, रवींद्र माळवदकर, संदीप लडकत, श्याम सातपुते, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे, बाळा शेडगे, आळंदी देवस्थान कमिटीचे माजी विश्वस्त अभय टिळक, जयंत कुलकर्णी, भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष संदीप पळसे, सन्मित्र सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल गायकवाड, जया किराड, संजय ढेरे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.