Pune: राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती पुणे जिल्हाध्यक्षपदी पुजा बुट्टे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्षपदी जुन्नर येथील पुजा बुट्टे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या हस्ते बुट्टे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, जुन्नर तालुक्याचे युवानेते अतुल बेनके उपस्थित होते.

देशाचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा केलेला विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहचविला जाणार आहे. पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविला जाणार आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुजा बुट्टे यांनी निवडीनंतर सांगितले. पुजा या उच्चशिक्षित असून त्यांनी इंग्लंड येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या माध्यमातून महिला व मुलींच्या सर्वांगणी विकासासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.