Talegaon : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त डोळसनाथ महाराज मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा दीपोत्सवाची कार्यक्रम आज (गुरुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा देखील म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला. अशी आख्यायिका असून त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. वडगावचा पोटोबा आणि तळेगावचा डोळसोबा ही मावळची जागृत दैवत आहेत. या ग्रामदैवतांचे आराध्य करण्यात प्रत्येक मावळवासी धन्यता मानतो. त्यामुळे तळेगाव येथील जागृत डोळसनाथ महाराज मंदिरात आज दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तळेगाव आणि परिसरातील भाविक भक्तांनी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक संतोष भेगडे, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.