Ravet : रावेतमध्ये 1008 जोडप्यांच्या हस्ते होणार दीपोत्सव

एमपीसी न्यूज – अयोध्येत सोमवारी रामलल्लाची प्रतिष्ठापना (Ravet) होणार आहे. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रावेत येथील नागरिकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी संध्याकाळी 6 वाजता 1008 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सिटी प्राइड येथील मैदानावर होणार असल्याची माहिती आयोजक अमोल कालेकर यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेविका संगीता भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे, नीलेश तरस, प्राजक्ता रूद्रावार आदी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri : सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरोधात देशव्यापी लढ्याचा निर्धार

रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी, लोक आपापल्या घरांमध्ये आणि (Ravet) जवळच्या मंदिरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा करू शकतात आणि रामाचे भजन गाऊन प्रतीकात्मक अयोध्येच्या कार्यक्रमात मनापासून सहभागी होऊ शकतात. त्या पार्श्वभुमीवर रावेत येथील सोसायट्यांमधील नागरिकांनी एकत्र येत याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन अमोल कालेकर, चैतन्य देशपांडे, तुषार निकम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.