Khed : बेकायदेशीर रित्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – घरगुती सिलेंडर मधून (Khed) छोट्या सिलेंडर मध्ये बेकायदेशीर रित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी खराबवाडी येथे केली.

सार्थक पांडुरंग कड (वय 21, रा. खराबवाडी, खेड) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल सूर्यवंशी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरोधात देशव्यापी लढ्याचा निर्धार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ज्वालाग्रही पदार्थाने इतरांच्या (Khed)  जीवितास धोका होण्याची शक्यता असताना देखील बेकायदेशीरपणे व कोणतीही सुरक्षा न बाळगता घरगुती गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस रिफील करत होता. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून 14 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.