Pune : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भर सभागृहात झोपून केला निषेध

एमपीसी न्यूज – झोपलेल्या प्रशासनाचा आणि झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्या जाधव आणि नगरसेवक योगेश ससाणे यांनी झोपून आणि घंटा वाजवून आज निषेध केला.

सततच्या पावसामुळे पुणे शहरातील वाहतूककोंडी होत आहे. वडगावशेरी भागात पाणी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांना जागे करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तुम्ही 100 नगरसेवक असला तरी तुमच्यावर अंकुश आम्ही ठेवणार आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिला.

शहरातील विविध प्रश्नांवर इतर नगरसेवकांना बोलायचे होते. स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांना जागे होण्याचे आवाहन केले. मनसेचे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनाही शहरातील समस्यांवर बोलायचे होते. मात्र, महापौर मुक्ता टिळक यांनी बोलू दिले नाही. काँगेस – राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांनी घंटा वाजवून निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.