Pune News : मार्केटयार्डातून आंबा विक्रेत्यांचे 12 मोबाईल चोरले; आंबा महोत्सवातील घटना

एमपीसी न्यूज-मार्केटयार्ड परिसरातील आंबा महोत्सावात (Pune News) चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरट्यांनी महोत्सावातून विक्रेत्यांचे तब्बल 12 मोबाईल मध्यरात्री चोरून नेले आहे. स्टॉल धारक झोपल्यानंतर उशाला  ठेवलेले  हे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अक्षय थोटम (वय 27, रा. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Pune News : लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड व सोन्याचे दागिने लांबविले

या घटनेने खळबळ उडाली असून, विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तक्रारदार आंबा महोत्सावासाठी पुण्यात आले असून, त्यांनी

मार्केटयार्ड येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सावात स्टॉल टाकलेला आहे. स्टॉल धारक येथेच झोपतात.

यादरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री  स्टॉल धारक झोपले असता तक्रारदार यांच्यासह इतरांचे झोपताना (Pune News)उशाजवळ ठेवलेले 61 हजारांचे 12 मोबाईल चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.