Pune News : पुणे महापालिका कर्मचाऱ्यासह कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून पुण्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिका आरोग्य सेवेत ते कार्यरत असताना आणि आपली जबाबदारी पार पडत असताना कुटुंबतील सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यांचे वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर आणि भाऊ विजय लक्ष्मण कुचेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

शामसुंदर कुचेकर यांचे निधन काल (ता. 22) सकाळी नोबल हॉस्पिटलमध्ये झाले. त्यानंतर कालच त्यांच्या भावाचे म्हणजेच विजयकुमार यांचे जम्बो कोविड सेंटर येथे काल (ता. 22) दुपारी निधन झाले. तत्पूर्वी, 16 एप्रिल रोजी आईचे जहांगीर हॉस्पिटलला आणि वडिलांचे 09 एप्रिल रोजी जम्बो कोविड सेंटरला निधन झाल होते. यासोबतच त्यांच्या पत्नी अश्विनी श्यामसुंदर कुचेकर यांचेही निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment