-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : महापालिकेच्या वाहनांना 43 लाखांचे ऑईल आणि ग्रीस ?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या गाड्यांसाठी 43 लाख रुपयांचे ऑइल आणि ग्रीस खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे बर्‍याच गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी शोरुमला जात असताना सुद्धा गाड्यांना 43 लाख रुपयांचे आईल आणि ग्रीस लागत आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

महापालिका वाहन विभागाकडुन ही निविदा काढण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. प्रस्ताव सादर करताना विभागाने महापालिकेच्या किती गाड्या आहेत. त्या कोणत्या प्रकारच्या आहेत. किती लिटर ग्रीस ऑईल लागणार आहे याचा कोठेही उल्लेख केलेला नाही. पदाधिकारी आणि अधिकारी वापरत असलेल्या बर्‍याच गाड्या या कंपनीच्या शोरुमला देखभाल दुरुस्तीसाठी जात असतात.

त्याचबरोबर महापालिका प्रशासनाकडून अधिकार्‍यांना गाड्या आणि कचरा वाहतुकीच्या गाड्या भाडेतत्त्वाने सुद्धा घेण्यात आल्या आहेत. यांची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची आहे. त्यामुळे 43 लाख रुपयांचे ऑइल खरेदी कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.