Pune News : महावितरणच्या कोथरूड विभागातील 70 कंत्राटी कामगार दोन महिने वेतानापासून वंचित

एमपीसी न्यूज – महावितरणच्या कोथरूड विभागातील सुमारे 70 कंत्राटी कामगार दोन महिने (मे आणि जून 2021) वेतानापासून वंचित आहेत. त्यामुळे महावितरणच्या थकीत वीज बिलाची करोडो रूपयांची वसुली करणारे कामगारच वेतनापासून वंचित असल्याने या कामगारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना काळात आर्थिक समस्यांना तोंड देत असताना दोन महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांना आर्थिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

थकीत वेतन 11 जुलै 2021 पर्यंत सदर एजन्सी अथवा प्रमुख नियोक्ता यांच्याकडून सर्व कामगारांना प्राप्त न झाल्यास सर्व कंत्राटी कामगार सोमवार 12 जुलै 2021 पासून कोथरूड विभागीय कार्यालय एसएनडीटी कॉलेजसमोर धरणे आंदोलन करणार आहेत, असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे ( संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.