Pune News : आयएएसच्या 75 सायकलपटूंची पुणे टू हम्पी सहाशे किमी हेरिटेज राईडला आजपासून प्रारंभ

एमपीसी न्यूज : इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या (आय ए एस) 75 सायकलपटूंची (Pune News) पुणे टू हम्पी सहाशे किमी हेरिटेज राईड आजपासून सुरु होणार आहे. आज पहाटे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रकाश शेटबाळे उद्योजक अण्णा बिरादार, धनंजय शेडबळे, अनिल मित्तल, एफ डी सी लिमिटेडचे संदीप कुलकर्णी (इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सुहास माटे, पोलीस अधिकारी अजय दरेकर, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ व अमृता पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे.

आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय काम करणारी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या 75 सायकलस्वारांनी मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले होते आणि यावर्षी पुणे ते हम्पी असे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करून ते अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करणार आहेत. यासाठी पुन्हा एकदा आयएएसचे 75 सायकलस्वार पुणे ते हम्पीसाठी आज सायकलवर रवाना होणार आहेत.

पुणे टू हम्पी हे अंतर तीन दिवसात पार करण्यात येणार आहे. प्रवासाचा मार्ग पुढीलप्रमाणे –

पुणे ते मोहोळ – 240 किमी
मोहोळ ते विजापूर – 150 किमी
विजापूर ते हम्पी – 220 किमी

विजापूर येथील गोल घुमट व इब्राहिम रोजा या दोन ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. तीन दिवस हम्पीमध्ये मुक्काम असल्यामुळे विविध ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. संपूर्ण हम्पी परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा बद्दल माहिती घेण्यात येणार आहे. राईडमध्ये (Pune News) पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला आहे. सर्व रायडर्स सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सायकलिंग करणार आहेत.

पुणे ते हम्पी राईडमध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गिरीराज उमरीकर, अजित गोरे, रमेश माने, श्रीकांत चौधरी, सुशील मोरे, अमीत पवार, प्रतीक पवार, नितीन पवार, सुधाकर टिळेकर, अविनाश चौगुले, रवी पाटील, अमृता पाटील, पूनम रणदिवे, संदीप लोहकर, मंगेश दाभाडे, शिवाजीराव काळे, प्रशांत तायडे, दीपक नाईक, अभिनंदन कासार, स्वप्नील लोढा, दर्शन वाले, हनुमंत शिंदे, गणपत मसाळ, अभिजित सरवदे, रमेश सेनचा, रोनाक जैन, प्रवीण पवार, धनाजी गोसावी, अभय खटावकर, दत्तात्रय मेंदुगडे, राहुल जाधव, मंगेश भुजबळ, सुजित मेनन, माधवन स्वामी, वाल्मिक अहिरराव, देविदास खुर्द, अमित कडे, शीतलकुमार चौहान, अनिल पिंपळकर, डॉ. अजित कुलकर्णी, विवेक सिंग, चैतन्य वझरकर, अमित कुमार, सुबोध मेडीसीकर, प्रसाद सागरे, महेश वनीकर, हेमंत दांगट, पंजाबराव इंगळे, नरेश चड्ढा, अभिजित रोडे, तानाजी मांगडे, संतोष टोणपे, सचिन टोणपे, उमेश सुर्वे, श्रेयस पाटील, नितीन पवार, विवेक कडू, सुनिल चाको, प्रशांत जाधव, मदन शिंदे, अजित पुरोहित, ईश्वर जामगावकर, सागर शिरभाते, मोरेश्वर पिदडी, बालाजी जगताप, दीपक उमरणकर, दत्तात्रय आंधळकर, योगेश तावरे, योगेश कौशिक आदी सायकलस्वार सहभागी झाले होते.

Pune News

इंडो ऍथलेटिक सोसायटीने आजपर्यंत दहा वर्षांमध्ये (Pune News) शंभराहून अधिक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे घेतले आहेत. यामध्ये भक्ती शक्ती सायक्लोथोन, घोरवडेश्वर बाईक अँड हाईक, पुणे टू पंढरपूर सायकल वारी, पुणे टू शिवनेरी दुर्गवारी, नवरात्री रन, पुणे टू गेट ऑफ इंडिया अशा विविध राईड यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत.  संस्थेला विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे बरेचसे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खेळातून समाज प्रबोधन घडवण्यात ही संस्था नेहमीच पुढे असते. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय कार्य करण्यात इंडो ऍथलेटिक्स सोसायटी संस्था नेहमीच अग्रगण्य स्तरावर राहिली आहे.

Today’s Horoscope 07 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.