Pune News : कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या प्रतीकचा सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून एका इमारतीत काम करणाऱ्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये बावीस वर्षीय प्रतीक पाष्टे या तरुणांचाही समावेश आहे. प्रतीक हा पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 14 मध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता.

एका छोट्याशा घरात प्रतीक आई वडील आणि छोट्या भावासह राहत होता. त्याचे वडील आजारी असून त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रतीक आता या जगात नाही हे त्याच्या वडिलांना अजूनही माहित नाही. त्याचा छोटा भाऊ 14 वर्षाचा असून तो शिक्षण घेतोय. तर आई प्रभात रस्त्यावरील एका गल्लीत चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते..प्रतीकने झील महाविद्यालयातून नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते. आणि कुटुंबीयांचा आधारस्तंभ बनण्यासाठी प्रयत्न करत होता.

गुरुवारी दुपारी आपल्या वरिष्ठ सहकार्‍यांसोबत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. तो परत आलाच नाही. या दुर्घटनेत प्रतीक सह त्याच्या वरिष्ठ सहकारी महिंद्र इंगळे यांचादेखील होरपळून मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.