-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पुण्याच्या मध्यवस्तीत घराची भिंत कोसळली, दोघे जखमी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असतानाच पुण्याचा मध्यवर्ती परिसर असलेल्या खडकाळ परिसरात एका घराची भिंत कोसळली. या घटनेत घरात असणारे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात अडकलेल्या या दोघांना बाहेर काढून रुग्णालयात ऍडमिट केले.

सीमा किशोर रावडे (वय 46) व किशोर बबनराव रावडे (वय 52) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, रावडे कुटुंबीय खडकमाळ आळी परिसरात जुन्या घरात राहत होते. आज सायंकाळच्या सुमारास अचानक या घराचे छप्पर आणि भिंत कोसळली. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. त्यानंतर जवानांनी धाव घेत घरात अडकलेल्या दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

मध्यवर्ती अग्निशमन दलाचे प्रमोद सोनावणे, प्रदीप खेडेकर, पवार, गावडे, तुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn