Pune Crime News : कोंढव्यात कोकेन विकताना नायजेरीन जाळ्यात, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या नार्कोटिक विभागाने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंड्री परिसरातून कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ओलमाईड क्रिस्तोफर कायोदे (वय 42) असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरात सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी उंद्री परिसरात गस्त घालत होते. पथकातील कर्मचारी योगेश मोहिते यांना माहिती मिळाली की उंड्री परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विकतो. त्यानंतर पोलिसांनी भक्ती प्राईड सोसायटीत सापळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 5 लाख 29 हजार 900 रुपयांचे 52 ग्रॅम 980 मिली कोकेन जप्त केले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.