Pune News : कृषी विधेयकांविरोधात विविध संघटनांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज : कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टी, किसान मंच,अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती यांच्यासह अन्य संघटनांनी निदर्शने केली.

या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘शेतकरी, कामगार एकजुटीचा विजय असो’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मोदी सरकार हाय हाय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

_MPC_DIR_MPU_II

नाथा शिंगाडे, इमरान खान, अलका पावनगडकर, जोहाना लोखंडे अशरफ बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला आणि ‘भारत बंद’ला दलित पँथर संघटनेकडून पाठिंबा देण्यात आल्याची माहिती दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश साळवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.