Pune crime News : मित्रासोबत केलेल्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – मित्रासोबत केलेल्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट येथील कैलास भुवन हॉटेल शेजारील कॅनॉल रोडवर घडली.

याप्रकरणी शुभम रोकडे‌ ( वय 24, रा. शाहु वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती दर्शन, पुणे ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी वरुन पोलिसांनी प्रेम उर्फ टकल्या प्रताप परदेशी (वय 25, शिवदर्शन,पुणे ), ओंकार उर्फ पप्पु शंकर जोशी (वय 22, रा. शिवदर्शन, पुणे) अक्षय उर्फ गोट्या रामदास लोळे (वय 22, रा. पर्वती दर्शन, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम रोकडे‌ व आरोपी प्रेम परदेशी आणि ओंकार जोशी हे मित्र आहेत.

फिर्यादी शुभम रोकडे‌ यांची ओंकार जोशी याचे बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन, आरोपी प्रेम परदेशी याने फिर्यादी यांना ओंकार याचे घरी बोलावून घेऊन फिर्यादी शुभम रोकडे‌ यांना मोटार सायकलवरून स्वारगेट येथील कैलास भूवन हॉटेल शेजारील कॅनॉल येथे घेऊन गेले.

आरोपींनी संगनमत करून, ‘तू काल ओंकार याचे सोबत भांडणे का केले, आता तुला जिवंत सोडत नाही’ फिर्यादी शुभम रोकडे‌ यांच्या डोक्यात दगड मारुन, धारदार हत्याराने त्यांचे डोक्यावर व डाव्या हाताच्या दंडावर वार केले.

‘तु आमच्या सोबत भांडण करतो का’ असे म्हणुन फिर्यादी शुभम रोकडे‌ यांना शिवीगाळ केली. तसेच, दगडाने व चिनीमाती सारख्या टोकदार वस्तुने मारहाण करुन जखमी केले.

जखमी झालेल्या फिर्यादी शुभम रोकडे‌ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वारगेट कॅनॉलमध्ये ढकलून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.