Pune News : 31 डिसेंबरला इयरएंड नाईट पार्टी, फटाकेबाजीवर बंदी !

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरात रात्री पावणे अकरा वाजेपर्यंतच 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करता येणार आहे. परंतु घराबाहेर न पडता घरातच इयरएंड नाईट पार्टी करता येईल. मात्र, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, फटाकेबाजी, मिरवणूक काढण्यावर पुर्णत: बंदी असेल, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

महापालिकेच्या आदेशानुसार, नववर्षाचे स्वागत साधेपणाने घरातच राहून साजरे करावे लागेल. कुठल्याही प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. ध्वनीप्रदुषण होणार नाही, याची खबरदारी घेऊन फटाके आणि आतिषबाजी करण्यावर बंदी असणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यावर पुर्णत: बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळांवर गर्दी करता येणार नाही. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षांखालील लहान मुले यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये.

महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार आदी आस्थापने रात्री पावणे अकरा पर्यंत सुरू राहतील. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला धार्मिक स्थळावर सोशल डिस्टंस पाळून मास्क व सॅनिटायजरचा वापर करावा, असे महापालिका आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.