Pune News : ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील आव्हाट गावात ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. उतारावर असलेल्या वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॅक्टरही पलटी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात  एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात दत्ता पुनाजी आढळ (वय 33) आणि विलास गंगाराम बुरुड (वय 29) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष सोमाजी किरवे हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आव्हाट येथून दगड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उतारावर वळण घेत असताना अचानक पलटी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.