Pune News : पुण्याच्या शाश्वत विकासावर केंद्राची मोहोर !

पुणे शहराने सीएसएसीएफ 2.0 मध्ये सर्वाधिक रेटिंग मिळविले

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी मिशनने आयोजित केलेल्या “क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क 2.0” मध्ये एकूण 4 स्टार रेटिंगसह देशातील इतर 8 शहरांसह पुणे पहिल्या लीगमध्ये आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने 28 निर्देशकांच्या सुधारित संचासह हवामान स्मार्ट शहरे मूल्यांकन फ्रेमवर्क सीएससीएएफ 2.0 मध्ये अंकीत केले आहे. भारतीय शहरांना हवामान बदलांचा सामना करण्यासाठी दिशा देणे, हा उद्देश या मुल्यांकनाचा आहे.

क्लायमेट स्मार्ट सिटीज मूल्यांकन पद्धतीत पाच विभागांतील निर्देशकांचा समावेश आहे. यात ऊर्जा आणि हरित इमारती, नगररचना, ग्रीन कव्हर आणि जैवविविधता, गतिशीलता आणि वायु गुणवत्ता, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या घटकांचा समावेश आहे.

शहराचा शास्वत विकास करण्याच्या आणि शहराला हरित बनविण्याच्या उद्देशाने पुणे शहर प्रशासन हवामानातील स्विकारर्हता निर्माण करण्यासाठी अलिकडच्या वर्षांत अनेक उपक्रम राबविण्यात अग्रभागी आहे. परिणामी ‘एनर्जी आणि ग्रीन बिल्डिींग’ व ‘कचरा व्यवस्थापन’ या दोन श्रेणींमध्ये पुण्याला 5 स्टार रेटिंग मिळाले.

याबाबत माहिती देताना म्हणाले, “या मुल्यांकनामुळे शाश्वत आणि बदलत्या हवामनुरून होणाऱ्या कामांना प्रमाणपत्रच मिळाले आहे. याबरोबर पुण्यासह देशातील इतर शहरांनी अवलंबिलेल्या कार्यपध्दतीची माहिती समजून घेण्यासाठीही मदतही झाली आहे. पुणे शहराचा विकास करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी पुणे शहर कायमच अग्रभागी राहणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.