Pimpri Corona Upadate : शहरात आज 279 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 185 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 185 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 279 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 57 हजार 288 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 199 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 354 रुग्ण गृहविलगीकरणात असून 845 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 40 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 418 आहेत. आज दिवसभरात 18 हजार 450 जणांचे लसीकरण झाले. तर, आजपर्यंत 6 लाख 29 हजार 620 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.