Pune News: ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता आठवी रुग्णवाहिका रुजू

यापूर्वी ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता या रुग्णवाहिकांची सोय होती. पुणे शहराकरीता या रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत.

एमपीसी न्यूज – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे आठवी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देणा-या 7 रुग्णवाहिका विनामूल्य पुणेकरांसाठी कार्यरत होत्या. त्यामध्ये कै. गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ देणगी म्हणून देण्यात आलेली आणखी एक रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू झाली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी उत्सवकाळात कोतवाल चावडी येथे रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण यांसह देणगीदार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यापूर्वी ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता या रुग्णवाहिकांची सोय होती. पुणे शहराकरीता या रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत.

तर, पुण्याबाहेर महाराष्ट्रात कोठेही जाण्याकरीता अत्यल्प खर्चात ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. सुसज्ज अशा रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत. आता यामध्ये आठव्या रुग्णवाहिकेची भर पडली आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.