Pune News: ‘एफपीएआय’च्या वतीने तृतीय पंथीयांसाठी दवाखाना

Pune News: Dispensary for transgenders on behalf of FPAI एफपीएआय गेली 15 वर्षांपासून तृतीयपंथीसाठी काम करत आहे. त्यांच्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये फिरता दवाखाना चालविला जातो आणि त्यांना विविध सुविधा दिल्या जातात, असे संस्थेकडून सांगण्यात आले.

एमपीसी न्यूज – ‘एफपीएआय’च्या वतीने 71 वा वर्धापनदिन दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी दवाखाना सुरु करण्यात आला आहे. दर सोमवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत हा दवाखाना सुरू असणार आहे.

कोथरूड येथील गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लीनिक येथे खास तृतीय पंथीयांसाठी हा दवाखाना सुरू करण्यात आला. एफपीएआयचे शाखा अधिकारी सोनवणे, सचिव देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते सागर शेडगे आणि तृतीयपंथी गुरू दीपा भोसले उपस्थित होते.

दीपा भोसले यांच्या हस्ते फीत कापून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सगळे नियम पाळून हा समारंभ साजरा करण्यात आला.

तृतीयपंथीयांना समाजामध्ये अजूनही योग्य ती वागणूक दिली जात नाही. त्यामुळे त्यांना सगळीकडे अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

परंतु, एफपीएआयने त्यांची ही अडचण ओळखून खास तृतीयपंथीयांसाठी दवाखाना सुरू केला जात आहे. याबद्दल दिपा भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हा दवाखाना दर सोमवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत सुरू असणार आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टर्सचे मार्गदर्शन, औषधोपचार आणि रक्त तपासण्या मोफत पुरविल्या जाणार आहेत.

एफपीएआय गेली 15 वर्षांपासून तृतीयपंथीसाठी काम करत आहे. त्यांच्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये फिरता दवाखाना चालविला जातो आणि त्यांना विविध सुविधा दिल्या जातात, असे संस्थेकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.