Pune News : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे शनिवारी विद्यापीठात  प्रकाशन 

एमपीसी न्यूज – डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ६६ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती या महत्वाच्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. २१) सकाळी १०:३० वाजता मुख्य इमारत संत ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे. 

 

 माजी गृहमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तसेच विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे  व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानावर समग्र अभ्यासातून निर्माण झालेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचा हा ग्रंथ आहे.
महाराष्ट्रातील अनेक नामवंत इतिहासकार, इतिहास अभ्यासक, विद्वान,  लेखक, कवी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, रसिक, वाचक असे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या  कार्यक्रमास विशेष उपस्थित राहणार आहेत. या महाग्रंथाची निर्मिती चेतक प्रकाशन यांनी केली असून फुले शाहू आंबेडकर विचार मंडळ – भोर, फुले शाहू आंबेडकर शिक्षक, शिक्षकेतर संघ, फुले शाहू आंबेडकर विचार मंच – पुणे,  डॉ. सुनिल धिवार, विठ्ठल गायकवाड, डॉ.आर.एस.पंडित, सतीश वाघमारे, संतोष मदने,  डॉ. रोहिदास जाधव, दादासाहेब सोनवणे, महेश थोरवे,  डॉ. मिलिंद निकाजे यांनी  कार्यक्रमाचे संयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर व आंतरराष्ट्रीय विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.