Pune News : शहरातील हॉकी क्रीडाक्षेत्रातील संघटक फिरोज शेख यांचे नाव नॅशनल प्राईड ऑफ बुक्स् रेकॉर्ड्स 2021 मध्ये समाविष्ट

एमपीसी न्यूज – नॅशनल प्राईड ऑफ बुक्स् रेकॉर्ड्स 2021 (एनपीबीआर, (डिजीटल) मध्ये पुणे शहरातील माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक फिरोज हुस्सेन शेख याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. क्रीडा संघटक म्हणून काम करणार्‍या आणि एसएनबीपी  ग्रुप ऑफ इंन्स्टिट्युटच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक असलेले फिरोज शेख यांचे शिक्षक दिनाच्या (5 सप्टेंबर) दिवशीच एनपीबीआरमध्ये नाव समाविष्ट करण्यात आल्याने त्यांच्या कार्याप्रति ही एकप्रकारची गुरूदक्षिणाच ठरली आहे.

पुणे, पिंपरी आणि चिंचवड भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हॉकी क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व वयोगटासाठी करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून शेख यांचे नाव एनपीबीआरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

फिरोज शेख हे माजी हॉकीपटू तसेच अंपायर म्हणून प्रख्यात आहेत. पिंपरी चिंचवड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ड्युबॉल संघटनेचे उपाध्यक्ष अशा पदांवर काम केलेल्या शेख यांनी शहरामध्ये गेल्या १९ वर्षांपासून प्रशिक्षण दिले आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. कै. हुसेन सिल्व्हर कप, ऑल इंडिया एसएनबीपी 16 वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आले आहे.

याआधी क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हा क्रीडा कार्यालय (डिएसओ), पुणे यांच्यावतीने सर्वोत्कृष्ट क्रीडा संघटक 2016-17 म्हणून फिरोज शेख यांना गौरविण्यात आले आहे.

गुरूग्राम-आधारित एनपीबीआरचे सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य संपादक पुष्कर मेहता यांनी या विषेशाधिकृत आणि सामूहिक विचारधारेबद्दल सांगितले की, राष्ट्रांच्या अभिमानासाठी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या सर्व शिक्षकांचे स्मरण करणे व त्यांचा गौरव करणे योग्य ठरते.

सर्व नायकांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी एनपीबीआर एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे. सर्व नायकांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी एनपीबीआर एक राष्ट्रीय व्यासापीठ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.