Pune Crime News : सिंहगड रस्त्यावर सराईत गुन्हेगाराचा धुमाकूळ, रस्त्यावर दुचाकी आडवी लावून तरुणाला लुबाडले

एमपीसी न्यूज-पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सराईत गुन्हेगारासह ( Pune Crime News ) दोघांनी एका तरुणाला भर रस्त्यात दुचाकी आडवी लावून लुबाडले. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पार या ठिकाणी 13 फेब्रुवारी च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 

Pune News : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई; शहरातील 11 हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश

आदित्य रोहिदास रांजणे (रा. निवृत्ती नगर, वस्ती वडगाव बुद्रुक) आणि गणेश पांडुरंग चोरगे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील गणेश चोरगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वैभव रामचंद्र बोराडे या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण दुचाकीने घरी जात असताना आरोपीने रस्त्यावर दुचाकी आडवी लावून त्याला अडवले. आरोपी पैकी एकाने फिर्यादीला मी पारावरचा भाई आहे ( Pune Crime News ) मला तुझ्याकडील सर्व पैसे दे असे म्हणून त्याचे कडे असलेले लोखंडी धारदार वस्तूचा धाक दाखवला. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पाकिटातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.