Pune News : मंथन फाउंडेशनतर्फे ऑनलाईन श्वसन रोगप्रतिकारक शक्तीवर्धक कोविड काळातील योगाभ्यास संपन्न

एमपीसी न्यूज – मंथन फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र पुणे तर्फे स्थापित 19 ऑनलाईन ग्रुप मार्फत 700 पेक्षा जास्त जणांना कोविड विरूद्धच्या लढाईसाठी  फुफ्फुसाची क्षमता वाढवून ऑक्सिजन मात्रा वाढवण्यासाठीचे योग प्रशिक्षण घेण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, सोलापूर, अकोला अशा अनेक जिल्हांमध्ये शिबिरात अनेक लोक सहभागी झाले होते.

नव्यानेच सुरू झालेल्या YCMOU योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांतर्फे 15 ते 21 मे 2021 या कालावधीत विविध 19 ऑनलाईन ग्रुप तयार करून 7 दिवसीय ऑनलाईन शिबिराचे माध्यमातून योग प्रशिक्षण देण्यात आले. त्या पाठीमागे निरामय संस्थेचे आधारवड गिरीश वेलणकर सर व त्यांचे परभणी येथील सर्व सहकारी यांची मुख्य प्रेरणा होती. त्या प्रेरणेतून परभणी निरामय मध्ये प्रशिक्षित 25 योग शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. मंथन फाउंडेशन संचलित निरामय योग प्रसार केंद्र शिबिरामध्ये नामाकित डॉक्टर्स, इंजिनीअर्स , शिक्षक व विविध गृहिणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

कोविड कालावधीत योगाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

आजूबाजूला समाजात कोविडने थैमान घातले असतानाही covid Positive रुग्णांसाठी तसेच Covid होऊन गेलेल्या सर्वांसाठी शिबिर नियोजन केले होते. त्यामुळे रुग्णांना योग केल्याने अल्पावधीत covid वर विजय मिळवून बाहेर येण्यास मदत झाली. या अनुभवातून निरामय संस्थेने विविध डॉक्टर्स व योग शिक्षक 1 हजार शिबिरे घेतली आहेत.

मंथन निरामय शिक्षकांनी सतत योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे पहिल्या बॅचच्या 57 प्रशिनार्थींना याचे प्रशिक्षण दिले. त्यांचे 5-5 वेळा सराव घेवून त्यांना चांगले प्रशिक्षित केले व त्यांचे तीन तीनचे विविध 19 गट स्थापित करून यशस्वीरीत्या अभ्यासक्रमाच्या first Batch च्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

अशीच अनेक शिबिर सतत राबवून समाजातील विविध घटकांना मनोबल देण्यासाठी व स्वतःची प्रतिकार शक्ती योगाच्या माध्यमातून  वाढवण्यासाठी मंथन निरामय पुणे येथील टीमचा मानस आहे.

मंथन फाउंडेशन अध्यक्षा व्यवस्थापिका आशा भट्ट वेलणकर, केंद्र प्रमुख विद्या आहेरकर, योग शिक्षक डॉ.सतीश बापट, डॉ. नीता पद्मावत, प्रा. राम काकडे, डॉ. अर्चना मुदखेडकर, डॉ. मीनाक्षी रेड्डी, सविता स्वामी, रविना कुलकर्णी, पल्लवी चौधरी, आरती मनुरकर, शीतल साडेगावकर, मंथन फाउंडेशनच्या विश्वस्त ऐश्वर्या खोत, देविदास मोरे तसेच सल्लागार दीपक निकम आदींचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.