Pune News: पुण्यात दुर्गोत्सवाची महापौरांकडून घोषणा  

एमपीसी न्यूज: संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे शहर महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांच्या संकल्पनेतून एक अभिनव आणि सर्वसमावेशक असा उपक्रम दुर्गोत्सवाची घोषणा करण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळ, आणि मीती इन्फोटेनमेंट चे व्यंकटेश मांडके , अनिरुद्ध राजदेरकर , शंतनू कुलकर्णी उपस्थित होते .

अगदी हाऊसिंग सोसायटींमध्ये ते आपल्या घरातल्या गॅलर्‍यांमध्ये साऱ्यांनी आपल्या पाल्यांना घेऊन दुर्ग बनवावेत कल्पकतेने त्याला सजवावे , त्यावर चित्र ठेवावीत आणि त्याचे फोटो www. themawala . com वरील दुर्गोत्सवाच्या संकेतस्थळावर जाऊन वेगवेगळ्या बाजूंनी ३ फोटो अपलोड करत आपला सहभाग नोंदवावा . ३ मधील एक फोटो हा दुर्ग बनविणाऱ्यांसोबत असावा . पूर्वनियोजित संकेतस्थळावर टाकावेत .

पुणे शहरात घोषित केलेल्या ह्या उपक्रमास भौगोलिक सीमेच्या काहीच मर्यादा नाहीयेत सदर उपक्रम २ नोव्हेंबर २०२१ पासून २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत फोटो अपलोड करण्यासाठी खुला असेन अभिनव प्रयत्नांना माध्यमांतून प्रसिद्धी मिळावी, सहभागींचे कौतुक व्हावे असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.दुर्गोत्सव २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि ह्या उपक्रमाचा मूळ उद्देश हा आपल्या शहरातील लहानग्यांचा ह्या अनोख्या उपक्रमामध्ये सहभाग हा आहे.

सदर उपक्रम हा एक स्पर्धा नसून एक मोहीम, एक चळवळ म्हणून घोषित करण्यात येत आहे. सहभागी होणाऱ्या साऱ्यांनाच डिजिटल स्वरूपाचे “स्तुतिपत्र” देण्यात येईल.पुणे शहर हे शिवजन्मोत्सव आणि गणेशोत्सव ह्या सारख्या सार्वजनिक सोहळ्यांचे उगमस्थान आहे. येथे त्याच धरतीवर शहरातील छोट्या नागरिकांसाठी अशीच एखादी सर्वसमावेशक मोहीम सुरु करण्याचा उद्देश ह्या दुर्गोत्सवातून साधला जावा अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही. साऱ्याच नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.