Pune News: कोविड सेंटरमधील तातडीच्या औषध सेवेसाठी निधी देण्यास मान्यता

एमपीसी  न्यूज: पुणे महापालिकेच्या बाणेर येथील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड हॉस्पिटल येथे तातडीचा औषध पुरवठा करणाऱ्या  आर. ए. एस. पी. एल. इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि सीओईपी जम्बो कोविड सेंटर इमर्जन्सी मेडिसिन सर्व्हिसेस या संस्थांसाठी अनुक्रमे दोन आणि तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध भांडारातून आवश्यकतेनुसार औषध पुरवठा केला जातो. कोविड सेंटरमधून होणार्या औषधांच्या मोठ्या मागणीमुळे औषधांचा पुरवठा करताना मर्यादा येतात.

रुग्णांना उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या  संस्था औषध देण्याबाबत वेळोवेळी निर्णय घेत असतात. त्यामुळे तातडीने द्यावयाची अत्यावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध करून देताना रुग्णांची गैरसोय होऊ शकते. या बाबींचा विचार करून वरील दोन संस्थांच्या माध्यमातून तातडीचा औषध पुरवठा केला जातो. आतापर्यंत त्यांनी वितरीत केलेल्या औषधांवर झालेल्या खर्चाच्या रकमेइतकी बिले देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.