Tathwade News: हास्य विनोद, कोपरखळ्या अन् खेळीमेळीच्या वातावरणात राजकारणातील दिग्गजांची दिवाळी

एमपीसी न्यूज – हास्य विनोद, कोपरखळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पुणे आणि पिंपरी – चिंचवड मधील दिग्गजांची दिवाळी बुधवारी सुरु झाली. आरोप – प्रत्यारोप, नेहमीचे वाद – विवाद, पक्षीय राजकारण, वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन आयोजित केलेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.

‘दिशा सोशल फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळाचे आज (बुधवारी) आयोजन करण्यात आले होते. ताथवडे येथील ‘ब्ल्यू वॉटर’ हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पुणे, पिंपरी – चिंचवडमधील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, प्रशासन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, भाऊराव कऱ्हाडे, पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम  यावेळी उपस्थित होते.

तसेच मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, उद्योजक बाळासाहेब कदम, उद्योजक संदीप पवार, पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, डॉ. पंडित शेळके, डॉ. नितीन घोरपडे, अभिनेते संजीवकुमार पाटील, राजू शिंदे, नितीन धंदुके, प्रभाकर पवार, संदीप साकोरे, संगीतकार तेजस चव्हाण, छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले, दिशा ही संस्था शहरात वैचारिक व सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून सतत नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असते.

खासदार बारणे म्हणाले की, शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्व दिग्गज या निमित्ताने एकत्र येतात. राजकीय विचार बाजूला ठेवून दिवाळी फराळाचा आनंद लुटतात. ही संधी दिशा फाउंडेशन गेली पाच वर्षे उपलब्ध करून देते.

प्रवीण तरडे म्हणाले की, विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून सामाजिक एकोपा जपणे, वैचारिक आदान प्रदान करणे आणि मनातील कटुता संपवणे, अशा प्रकारचे विधायक कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणे गरजेचे आहे. विविधांगी कार्यक्रमाचे सातत्य हे दिशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण एकत्र आलोय. चांगले विचार, चांगले कार्य, चांगल्या भूमिका यावर नेहमीच चर्चा व्हायला हवी. दिशाच्या दिवाळी फराळाच्या उपक्रमात तो हेतू साध्य होताना दिसतो आहे, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशाचे अध्यक्ष नाना शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांनी स्वागत केले. दिशाचे सचिव संतोष निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजनात नाना शिवले, संतोष बाबर, राजेंद्र करपे, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे, गोरख भालेकर, सचिन साठे आदींनी सहभाग घेतला.

दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ‘संग्राम अब भी बाकी है, ही कविता सादर करून यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तसेच राम नही लौटे है अब भी, रावण अभी बाकी है | अमृत लेकर घूम रहा, वह रावण अभी बाकी है ||
ही कविता त्यांनी सादर केली. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता राखणे हे आपल्या देशाचे महत्त्वाचे सूत्र असून ते आपण पाळले पाहिजे. दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येऊन वैचारिक मंथन करणे हा दिशाचा स्तुत्य उपक्रम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.