Pune News: साने गुरुजी नगर वसाहत पुनर्विकास कामासाठी मान्यता

एमपीसी न्यूज: साने गुरुजी नगर (आंबील ओढा) येथील वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पासाठी निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने सादर केलेल्या पूर्वगणन पत्रकापेक्षा ११.११ टक्के कमी दराने आलेल्या निविदेला मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी सुमारे १३ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जीएसटीपोटी सुमारे एक कोटी ८१ लाख रुपये आणि रॉयल्टी म्हणून २ लाख ९५ हजार रुपये आणि मटेरियल टेस्टिंग साठी २८ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रासने म्हणाले, महापालिका कर्मचाऱ्यांची घरे असणाऱ्या साने गुरुजी नगर पुनर्विकासाचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या वसाहतीची निर्मिती होऊन पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. या वसाहतीतील काही इमारती धोकादायक झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यास तीस महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.